प्रतिनिधी / बेळगाव
येथील श्री जय भवानी युवक मंडळाच्यावतीने भारतीय सैन्यातील सीमा सुरक्षा दलात भरती झालेल्या जगदीश अरुण पाटील या युवकाला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम मंगळवारी झाला.
सुरुवातीला बी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील आणि सध्या भारतीय सेनेत कार्यरत असलेला दिनेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे अध्यक्ष पी. जी. पाटील बोलताना म्हणाले, जगदीशला देशसेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. चिकाटी, जिद्द, हुषारी आणि प्रोत्साहन यामुळे त्याला मिळालेले यश युवकांना प्रेरित करणारे आहे. शेवटी जगदीशने सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल आभार मानले. यावेळी एम. आय. पाटील, परशराम (नाना) पाटील, दीपक पाटील, प्रभाकर नावगेकर, संदीप सागर पाटील, नारायण बेळगावकर, उद्योजक संतोष पाटील, अक्षय पाटील, छोटू नावगेकर, सूरज, मनोहर कुकडोळकर, अरुण पाटील, विष्णू पाटील, भाऊ धामणेकर, मंडळाचे पदाधिकारी जगदीशचे सर्व कुटुंबीय गावचे युवक उपस्थित होते.









