अभिनेत्रीचे ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारे
अभिनेत्री शालिनी पांडे ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. शालिनीचे ट्रान्सफॉर्मेशन जबदरस्त दिसून येत आहे. सोशल मीडियावर तिची ग्लॅमरस छायाचित्रे व्हायरल होत ओत. ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनीने बॉलिवूडकरता विशेष प्रकारचा दबाव जाणवला नसल्याचे म्हटले आहे.
मला नेहमीच माझ्यावर विश्वास राहिला आहे. कुठल्याही प्रकारची शरीरयष्टी प्राप्त करण्यासाठी मी कधीच दडपण घेतलेले नाही. शारीरिक दृष्टय़ा विशेष प्रकारे दिसण्यावरून महिलांवर मोठा दबाव असतो. याचमुळे स्वतःमध्ये झालेल्या बदलांना मी कुठल्याही ट्रान्सफॉर्मेशन म्हणून पाहत नसल्याचे ती सांगते.

स्वतःच्या प्रकृतीबद्दल मी नेहमीच जागरुक राहिली ओह. जीवनात आतापर्यंत आरोग्यदायी आहारच घेतला आहे. बॅडमिंट आणि व्हॉलिबॉल यासारख्या क्रीडाप्रकारांमध्ये भाग घेत इयत्ता 5 वीपासूनच पोहणे सुरू केले होते. यामुळे तंदुरुस्ती पूर्वीपासूनच राखल्याचे तिने म्हटले आहे.
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी नेहमीच उत्सुक राहिली आहे. अभिनय आणि चित्रपटनिर्मिती प्रक्रियेचा आनंद उचलला आहे. याचमुळे हिंदीतील पदार्पणाचा दबाव जाणवला नसल्याचे तिने सांगितले आहे. अर्जुन रेड्डी या मूळ तेलगू चित्रपटामुळे शालिनी पांडेचे आता देशभरात चाहते निर्माण झाले आहेत. तिला बॉलिवूडसाठी अनेक प्रस्ताव मिळत आहेत.









