ऑनलाईन टीम / मुंबई :
समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी राजसभेत बॉलीवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, काही ठराविक लोक इंडस्ट्रीबद्दल वाईट बोलत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे फक्त इंडस्ट्रीच नाही तर आपली संस्कृती-परंपरा यांचीही बदनामी होत आहे. ते म्हणतात इथेे ड्रग्ज रॅकेट चालते. हा फक्त राजकीय किंवा इतर कोणत्या क्षेत्राचा भाग नाही? हे थांबवण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांची आहे.
तसेच यावेळी ड्रग्जवरून बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केेली.
यापूर्वी राजसभेत बोलताना जया बच्चन म्हणाल्या होत्या की, बॉलीवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात असे म्हटले होते.









