जयसिंगपूर / प्रतिनिधी
आज 5 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी जयसिंगपुर मंडळलाच्या वतीने अयोध्यात श्री राम मंदिर शिलान्यासाचा कार्यक्रमानिमीत्य राम मंदीर , जयसिंगपुर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दीपोत्सव साजरा करून श्रीरामाच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन महाआरती करण्यात करण्यात आली. रांगोळी काढून सगळीकडे दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच नागरिकांना साखर पेढे वाटण्यात आले.कार्यकर्त्यांनी घरावर भगवा ध्वज लावून तसेच घरी दीप प्रज्वलित करून आनंद उत्सव साजरा केला.
तसेच ह्यावेळी १९९० व १९९२ साली अयोध्येला जाऊन आलेल्या कारसेवकांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. ह्यामधे प्रामुख्याने शंकरराव कुलकर्णी व त्यांच्या धर्मपत्नी शुभांगी कुलकर्णी, विनायक व दिपक अणेगिरीकर, हेमंत आपटे, हेमंत गोखले ही मंडळी होती. ह्यावेळी शंकरराव कुलकर्णी यांनी १९९० सालचे अयोध्येतील अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. ह्या वेळी राम मंदिराच्या ट्रस्टचे प्रमुख श्यामसुंदर मालु तसेच ट्रस्टी कांतीलाल मालु, नंदलाल मालु, तसेच माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजु मणियार व मालु कुंटुबीय हेही उपस्थित होते. ह्यावेळी सर्वांचे स्वागत मंडळ अध्यक्ष रमेश यळगुडकर यांनी केले. आभारप्रर्दशन काम मिलींद भिडे यांनी केले. याप्रसंगी अनंत कुलकर्णी,राजेंद्र दाईंगडे, वसंत पवार, सुनिल ताडे, कुलदीप देशपांडे, संतोष कुलकर्णी, पंकज गुरव, संतोष बिराजदार, भीमराव हदपद, स्वप्नील कुलकर्णी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








