ऑनलाईन टीम / जयपूर :
जयपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने एका महिलेकडून 2 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी रुपये आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर विमानतळावर आज सकाळी एका महिलेच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने सीमा शुल्क विभाग आणि पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. ही महिला संयुक्त अरब अमिरातीहून परतली होती. चौकशीवेळी घाबरलेल्या महिलेची झडती घेतली असता तिच्या बॅगमध्ये दोन किलो ड्रग्ज आढळून आले. प्राथमिक तपासात हे हेरॉईन असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी रुपये किंमत आहे. सीमा शुल्क विभाग यासंदर्भात अधिक तपास करत आहे.









