प्रतिनिधी / वाठार किरोली
आपल्या गावाचे नामांतर झाले आहे. आज पासून जयपूर या नावाने ओळख झाली आहे. परंतु फक्त नामंतरावर समाधान मानू नका या नावाला साजेसे समाज काम, विकास काम करून सातारा जिल्ह्यात जय जयकार झाला पाहिजे असे काम करा. त्यासाठी लागेल ती मदत खासदार फंड व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येईल. असे प्रतिपादन माजी राज्यपाल व सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावचे नाव बदलून जयपूर हे करण्यात आले .यावेळी होते ते बोलत होते यावेळी तहसीलदार अमोल कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने ,कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे ,सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष जितेंद्र भोसले ,जि प सदस्य भीमराव पाटील ,राष्ट्रवादी सातारा जिल्हा सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, सह्याद्री चे संचालक कांतीलाल पाटील ,वसंतराव कणसे पंचायत समिती सदस्य आण्णासो निकम ,कोरेगाव मार्केट कमिटीचे चेअरमन भागवत घाडगे, राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, सर्कल प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
गावचे नामांतर होत जयपुर करण्यात आले या आनंदोत्सवात संपूर्ण गावात गुढि तोरणे उभारून रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. नामांतरासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल खासदार श्रीनिवास पाटील , सरपंच प्रियांका नंदकुमार माने यांची गावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी बोलताना खा. पाटील म्हणाले 1980 पासून या गावात अनेकांनी नाव बदलण्यासाठी संघर्ष केला आहे .संयम चिकाटी धैर्य यामुळे नामांतराचा प्रश्न निकाली लागला आहे या गावातील लोक मूळचे राजस्थान मधील जयपूर चे आहेत तेच नाव आपल्या गावाला मिळाले आहे याचा आनंद आहे. जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले ,या गावचे नाव बदलण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनीच प्रयत्न केले आहेत. राजस्थानचे जयपूर सारखाच या गावचा विकास करणं प्रथम कर्तव्य आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपण ते काम पूर्ण करू यासाठी सर्व ग्रामस्थांनी गटतट विसरून विकास कामाच्या मागे ताकद उभी करा. यावेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, जि .प .सदस्य भीमराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक नंदकुमार माने सूत्रसंचालन दिपक साबळे आभार विकास निकम यांनी मानले.









