फेसबुक पोस्टवरून वाद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील जयगड येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात जोरदार हाणामारी झाल़ी ही घटना शुक्रवारी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जयगड खंडाळा रस्त्यावरील केदारी व गरकृपा हॉटेल येथे घडल़ी या मारहाणीत 4 जण जखमी झाले आहेत़ याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल जयगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आह़े मारहाणीत चाकू व पिस्तूलाचा देखील वापर करण्यात आला असल्याचे समोर आले आह़े
शारदा विश्वास कल्याणकर व त्यांचा मुलगा योगेंद्र विश्वास कल्याणकर, योगराज कल्याणकर (ऱा वाटद खंडाळा रत्नागिरी) व माजी पंचायत समिती सदस्य विवेक विलास सुर्वे याच्यासह महेश मानसिंग पाटील (ऱा दोन्ही संदखोल रत्नागिरी) यांच्या गटात हाणामारी झाल़ी शारदा कल्याणकर, योगेद्र कल्याणकर व महेश पाटील हे या मारहाणीत जखमी झाले आहेत़ परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्याने जयगड पोलिसांनी दोन्ही गटातील 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी योगेंद्र कल्याणकर याने सोशल माध्यमावर पोस्ट टाकली होत़ी यावरून विवेक सुर्वे व महेश पाटील यांनी योगेश याला फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिली होत़ी याप्रकरणी योगेंद्र याने जयगड पोलिसांत संशयितांविरूद्ध तक्रार दाखल केली होत़ी या प्रकरणावरून दोन्ही गटात वाद धुमसत होत़ा
महेश पाटील याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महेश हे गुरूकृपा हॉटेल खंडाळा येथे उभे होत़े यावेळी फेसबुक पोस्टवरून झालेला वाद मनात ठेवून योगेंद्र याचा भाऊ योगराज याने महेश याच्या हाव्या हातावर चाकूने वार केल़ा तसेच डोक्यावर पिस्तूल लावून गळयातील चैन हिसकावून नेल़ी तसचे योगराज याच्या सोबत असलेल्या 3 महिलांनी मारहाण केल्याचे महेश याने तक्रारीमध्ये नमूद केले आह़े
तर सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शारदा कल्याणकर व त्यांचा मुलगा योगेंद्र हे जयगड येथील केदारी हॉटेल येथे जेवणासाठी गेले होत़े यावेळी संशयित आरोपी विवेक व महेश हे देखील त्याठिकाणी उपस्थित होत़े शारदा यांनी †िदलेल्या तक्रारीनुसार योगंद्र याने दाखल केलेल्या तक्रारीचा राग विवेक याच्या मनात धुमसत होत़ा तसेच महेश याला दुपारी करण्यात आलेल्या रागातून विवेक व महेश यांनी योगेद्र जवळ येवून वाद घालण्यास सुरूवात केल़ी
यावेळी विवेक सुर्वे याने आपण बॉम्बने जिंदल कंपनी उडवून लावली होत़ी तसाच तुझ्या घराला पण बॉम्बने उडवून लावेऩ अशी धमकी योगेंद्र याला दिल़ी या वादातून विवेक व महेश यांनी योगेंद्र याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल़ी योगेंद्र याची आई शारदा या बचाव करण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आल़ी तसेच शारदा यांच्या गळयातील 2 तोळ्याची चैन विवेक व महेश यांनी हिसकावून नेल्याचे शारदा यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आह़े









