मुंबई \ ऑनलाईन टीम
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गुरुवारी अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. अँजिओग्राफीनंतर अँजियोप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी राजेश टोपे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील सोबत होते.
जयंत पाटील यांना मंत्रिमंडळ बैठकीत थोडी अस्वस्थता जाणवत होती. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत रुग्णालयात नेण्यास सांगितलं. आम्ही तातडीनं रुग्णालयात पोहोचलो. जयंत पाटील यांची प्रकृती चांगली आहे. ईसीजीमध्ये काही बदल जाणवतोय. टू डी इको, बल्ड टेस्टही नॉर्मल आहे. मात्र उद्या अँजिओग्राफी केली जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका असंही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांनी ट्वीट करून दिली माहिती
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








