ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर शुक्रवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले.
मात्र, त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला आणि ते आजूबाजूच्या परिसरात लपले. त्यानंतर त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केले असून अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही.
याआधी गुरुवारी देखील मध्य काश्मीर मधील बेडगाम जिल्ह्यातील चामोरा येथील केसरमुळा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती दलावर निशाणा साधला होता.