ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 576 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 942 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 193 आणि काश्मीर मधील 385 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 8 हजार 677 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे रविवारी 598 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 77,886 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 31,349 रुग्ण जम्मूतील तर 46,537 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1379 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 457 जण तर काश्मीरमधील 922 जणांनी आपला जीव गमावला आहे.