ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 677 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 708 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 313 आणि काश्मीर मधील 364 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 9 हजार 866 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 796 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 73, 502 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 29,540 रुग्ण जम्मूतील तर 43,962 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 437 जण तर काश्मीरमधील 903 जणांनी आपला जीव गमावला आहे.









