ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमधून दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 1,706 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 65,496 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 24,502 रुग्ण जम्मूतील तर 40,994 जण काश्मीरमधील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल 738 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 16 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 80 हजार 476 वर पोहोचली आहे. काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 290 आणि काश्मीर मधील 448 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 13 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 7352 आणि काश्मीरमधील 6360 जण आहेत.
- आत्तापर्यंत 1268 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 1268 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 395 जण तर काश्मीरमधील 873 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 25 हजार 624 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 712 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









