ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 635 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 83 हजार 064 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 235 आणि काश्मीर मधील 400 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 10 हजार 796 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- 70 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 976 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 70, 955 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 28,147 रुग्ण जम्मूतील तर 42,808 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1313 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 424 जण तर काश्मीरमधील 889 जणांनी आपला जीव गमावला आहे.









