ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 574 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 04 हजार 155 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 241 आणि काश्मीर मधील 333 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 570 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 580 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 96,972 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 39,094 रुग्ण जम्मूतील तर 57, 878 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1613 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 545 जण तर काश्मीरमधील 1068 जणांनी आपला जीव गमावला आहे.









