ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 501 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 757 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 267 आणि काश्मीर मधील 234 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 009 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 469 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,06,006 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 42,729 रुग्ण जम्मूतील तर 63,277 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1742 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 617 जण तर काश्मीरमधील 1125 जणांनी आपला जीव गमावला आहे.








