ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,467 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 59 हजार 711 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 785 आणि काश्मीर मधील 682 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 20 हजार 239 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 11,455 आणि काश्मीरमधील 8,784 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 38 हजार 521 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 8929 रुग्ण जम्मूतील तर 29,592 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 951 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 199 जण तर काश्मीरमधील 752 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 30 हजार 027 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 20 हजार 239 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









