ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 301 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 04 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 006 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 165 आणि काश्मीर मधील 136 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 4 हजार 076 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 465 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,12,093 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
यामध्ये 45,834 रुग्ण जम्मूतील तर 66, 259 जण काश्मीरमधील आहेत. तर आतापर्यंत 1837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 672 जण तर काश्मीरमधील 1165 जणांनी आपला जीव गमावला आहे.









