ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 248 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 19 हजार 628 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 144 आणि काश्मीर मधील 140 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 3 हजार 414 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 409 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,14,353 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 46,902 रुग्ण जम्मूतील तर 67,451 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1861 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 686 जण तर काश्मीरमधील 1175 जणांनी आपला जीव गमावला आहे.









