ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 648 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 057 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 268 आणि काश्मीर मधील 380 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 9 हजार 058 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 1323 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 75,641 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 30,275 रुग्ण जम्मूतील तर 45,366 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1358 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 445 जण तर काश्मीरमधील 913 जणांनी आपला जीव गमावला आहे.









