ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 824 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 73 हजार 014 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 540 आणि काश्मीर मधील 284 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 17 हजार 601 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 10,161 आणि काश्मीरमधील 7440 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 1408 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 54,267 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1146 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 320 जण तर काश्मीरमधील 826 जणांनी आपला जीव गमावला आहे.









