ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,036 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 65 हजार 026 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 563 आणि काश्मीर मधील 473 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 21 हजार 887 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 12,643 आणि काश्मीरमधील 9,244 जण आहेत.
- 42,115 रुग्ण कोरोनामुक्त
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी 1158 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 42,115 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 10,577 रुग्ण जम्मूतील तर 31,538 जण काश्मीरमधील आहेत.
- आत्तापर्यंत 1024 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 1024 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 246 जण तर काश्मीरमधील 778 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 27 हजार 819 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 21 हजार 887 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









