ऑनलाईन टीम / पुलवामा :
जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. तर अजून दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांबरोबरची चकमक रात्री उशिरा पासून सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण भागाला चारी बाजूंनी वेढले आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी कुरापती सुरु केल्या आहेेत. भारतीय सुरक्षा जवानांकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहेे.
तसेच अवंतीपोरा येथील बेगपोरा भागात शोध मोहीम सुरू आहे. तिथे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू लपल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रियाज नायकू हे वडिलोपार्जित गाव आहे. गेल्या चार दिवसातील ही पाचवी चकमक आहे.









