ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मूमधील लष्करी छावण्यांजवळ आज सलग चौथ्या दिवशी अज्ञात ड्रोनचा वावर आढळून आला. जम्मूच्या मीरान साहिब आणि कालुचक भागात पहाटे 4.40 वाजता दोन ड्रोन तर कुंजवानी येथील हवाई दलाच्या स्टेशन सिग्नलजवळ पहाटे 4.42 मिनिटांनी एक ड्रोन फिरताना सुरक्षा दलाच्या जवानांनी पाहिले. मागील 4 दिवसात जम्मूतील लष्करी छापवण्यांच्या परिसरात 7 ड्रोन आढळून आल्याने सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.









