अम्फला चौकाला हनुमान चौक असे नाव
वृत्तसंस्था/ जम्मू
उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून मोगलांशी संबंधित नावे बदलण्याचे सत्र आरंभिले होते. या मोहिमेचा प्रभाव आता जम्मू-काश्मीरमध्येही दिसून येत आहे. जम्मू महापालिकेने एक उपनगर अन् चौकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जम्मूतील शेखनगर आता शिवनगर या नावाने ओळखले जाणार आहे. तर शहरातील अम्फला चौक आता नवे नाव ‘हनुमान चौक’ म्हणून ओळखले जाईल. जम्मूचे महापौर चंदर मोहन गुप्ता यांनी जम्मू महापालिकेने शेखनगरचे नाव बदलून शिवनगर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. जम्मू महापालिकेकडून यासंबंधीचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.









