दिवसातील 23 तास राहते बेडवर
जगात अनेक प्रकारचे लोक असून त्यांना विविध प्रकारच्या समस्या असतो. वैद्यकीय शास्त्रात काही आजारांची लक्षणे समोर आल्यावरच त्याबद्दल अधिक माहिती कळू लागते. अशाच एका आजाराला 28 वर्षीय महिला तोंड देत आहे. ती शारीरिक दृष्टय़ा तंदुरुस्त असूनही बेडवर झोपून राहणे तिला भाग पडले आहे.

फोबिया ही मानसिक स्थिती असून ती समुपदेशनाने दूर केली जाऊ शकते. तर ऍलर्जी ही एक शारीरिक समस्या आहे. लिंडिस जॉन्सन नावाच्या 28 वर्षीय महिलेला अजब ऍलर्जी झाली आहे. ती चालण्यासाठी जमिनीवर उभी होताच तिला चक्कर येण्यासह उलटय़ा होऊ लागतात.
लहान मूल सर्वप्रथम जमिनीवर उभे राहून चालणे शिकते. परंतु त्याला उभे राहण्याचीच ऍलर्जी असेल तर तो कसा जगणार हा विचार करून पहा. लिंडिस जॉन्सनला अशाच प्रकारची ऍलर्जी आहे. यामुळे ती जमिनीवर 5 मिनिटे देखील उभी राहू शकत नाही. तिला गुरुत्वाकर्षणाचीच ऍलर्जी झाली आहे. हा प्रकार वाचताना विचित्र वाटत असला तरीही हेच सत्य आहे. उभी राहताच महिलेला चक्कर येणे, उलटय़ा होऊ लागण्याचा त्रास सुरू होतो. तर बेडवर पडून राहिल्यास तिला आराम मिळतो. याचमुळे ती दिवसातील 23 तास बेडवर पडून असते. आंघोळीसाठी देखील ही महिला शॉवर चेअरचा वापर करते.

अमेरिकेच्या मेनमध्ये बँगो येथे राहणाऱया लिंडसीला पूर्वी हा त्रास नव्हता. ती खूपच सक्रीय होती आणि नौदलात काम करायची. फेब्रुवारी महिन्यात तिला या आजाराची माहिती कळली, ज्याला पॉश्चुरल टॅकीकार्डिया म्हटले जाते. त्यापूर्वी 7 वर्षांपर्यंत ती उलटी होणे, चक्कर येणे, पाठदुखी, बेशुद्ध हेणे, पोटाखालील भागात वेदना इत्यादी लक्षणांना तोंड देत होते. पूर्वी तिला तणावामुळे हे घडले असावे असे वाटले, परंतु आपण ग्रॅव्हिटी ऍलर्जिक असल्याचे तिला कळले. आता ती बीटाब्लॉकर्सच्या मदतीने उलटी अन् बेशुद्ध होण्यापासून वाचत आहे. परंतु घराबाहेर पडण्याचा ती विचार करू शकत नाही.









