ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एमआरएसएएम-आर्मी या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर सकाळी 10.30 वाजता ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने दूर अंतरावरील लक्ष्यावर थेट आणि अचूक मारा केल्याचे DRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमआरएसएएम-आर्मी हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. DRDO आणि IAI इस्रायल यांनी संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. एमआरएसएएम आर्मी वेपन सिस्टममध्ये कमांड पोस्ट, मल्टी फंक्शन रडार आणि मोबाइल लाँचर सिस्टमचा समावेश आहे. डिलिव्हरी करण्यायोग्य कॉनफिगरेशनमध्ये प्रक्षेपणादरम्यान संपूर्ण फायर युनिटचा वापर केला गेला आहे.
गेल्या महिन्यात भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोर येथे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अपग्रेड केली होती.