कुंभारी परिसरातील घटना, चार जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरात असणाऱ्या वस्तीवर चोरी करण्यासाठी आलेल्या संशय चोराला वस्तीवरील लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्या संशयित चोराचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेनसिद्ध सिद्धप्पा माळी, अण्णाराव सोमलिंग पाटील अमोगसिद्ध भीमंना आमसे व बाबुराव शिवप्पा बन्ने ( सर्व रा. कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Previous Articleमहाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु
Next Article सांगली जिल्ह्यात 813 कोरोनामुक्त, नवे 580 रूग्ण









