वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार खशोगी- अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून कॉन्ट्रक्ट मंजूर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या 2018 मध्ये झालेल्या हत्येत सामील सौदी अरेबियाच्या 4 जणांना अमेरिकेत पॅरामिलिट्री प्रशिक्षण मिळाले होते असा खुलासा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. या सर्वांना कॉन्ट्रक्ट (कंत्राट) अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणासाठीचे कॉन्ट्रक्टर अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने मंजूर केले होते.
हे प्रशिक्षण टायर 1 ग्रूपकडून देण्यात आले होते. याची पॅरेंट कपंनी इक्विटी फर्म सरबर्स कॅपिटल मॅनेजमेंट आहे. सौदी अरेबियाच्या हस्तकांना निशाणेबाजी आणि हल्ला रोखण्याचे प्रशिक्षण मिळाले होते.
सौदी अरेबियाच्या नेत्यांना चांगली सुरक्षा पुरविण्यासाठी हे प्रशिक्षण पार पडले होते. परवानायुक्त कुठल्याही डिफेन्स एक्सपोर्ट कंपनीवर टिप्पणी करणार नाही. अमेरिकेचे धोरण सौदी अरेबियासाठी कायद्याचे राज्य आणि मानवाधिकाराला प्राथमिकता देणारे असल्याचे विधान अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी केले आहे.
टायर 1 ग्रूपशी संबंधित लुइस बेमर यांनी मागील वर्षी संसदेत प्रश्नांची उत्तरे देताना या प्रशिक्षणाच्या वृत्ताची पुष्टी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात ब्रेमर यांना पेंटागॉनमध्ये मोठे पद दिले जाणार होते. याचप्रकरणी संसदेकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण ट्रम्प प्रशासनाने ब्रेमर यांचे नामांकन मागे घेतले होते.
2018 मध्ये जमाल खशोगी यांची इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह अद्याप हस्तगत झालेला नाही. खशोगी हे वॉशिंग्टन पोस्टमध्ये सौदी अरेबिया सरकारवर टीका करणारे लेख लिहित होते. तर बायडेन प्रशासनाने सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना हत्येसाठी दोषी ठरविले होते.









