वार्ताहर/ जमखंडी
जमखंडीत सावरकर प्रति÷ानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील अर्बन बँकेजवळील चौकात प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सावरकर यांचा इतिहास माहीत नसलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यलहंका येथील उड्डाणपुलाला सावरकर यांचे नाव देण्यास विरोध करीत असल्याबद्दल प्रति÷ानचे अध्यक्ष शैलेश आपटे यांनी निषेध केला.
सावरकर यांनी दलित, अस्पृश्यांकरिता केलेली चळवळ, कोणत्याही अधिकाराची अपेक्षा न करता देशाकरिता केलेला त्याग, 1929 ला मालवण येथे दलित संमेलनाचे पहिले दलितत्तर अध्यक्ष, दलितांना मंदिर प्रवेशाकरिता पुढाकार अशा अनेक ऐतिहासिक घटना असूनही त्यांच्या इतिहासाला अस्पृश्यतेची वागणूक मिळाली असल्याचा आरोप शैलेश आपटे यांनी केला. त्यांच्या इतिहासाची शिकवण न देता गुलामगिरीच्या इतिहासालाच प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून खेद व्यक्त केला.
याप्रसंगी प्रति÷ानचे कार्यकर्ते सिद्धू कवटगी, प्रवीण कल्याणी, किरण बाणे, सिद्दू न्यामगौड, विठ्ठल मनमंदिर, संतोष कोळी, राघू भोवी, शशी जगदाळ, हणमंत बिरादार, ऍड. संतोष हिरेमठ, आनंद आलूर, महादेव कुंभार, आनंद भारत, प्रदीप मेटगुड, संजू गौडनवर आदी उपस्थित होते.









