वार्ताहर/ जमखंडी
तालुक्मयातील 25 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि. 30 रोजी येथील सरकारी पी. बी. हायस्कूलमध्ये होत असून त्याकरिता सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार संजय बी. इंगळे यांनी दिली.
प्रत्येक ग्राम पंचायतीला एक खोली असून येथे निवडणूक अधिकारी, साहाय्यक अधिकारी, उमेदवार व एजंट यांना बसण्याकरिता आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीकरिता दोन पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीस तीन टेबल व याकरिता एकूण 180 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलावर तीन फेऱयात मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी केंद्रात उमेदवार, एजंट यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तहसीलदार एस. बी. इंगळे यांनी पी. बी. हायस्कूलला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. उपप्राचार्य एन. बी. बिरादार व अन्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते.









