गरोदर महिलांप्रमाणे फिरताहेत पुरुष
मागील दोन दिवसांपासून जपानमधील सत्तारुढ पक्षाचे तीन नेते एक अत्यंत मोठे जॅकेट परिधान करून फिरत आहेत. 7.5 किलो वजनाचे हे जॅकेट परिधान करून ते कामावर जातात, शॉपिंग करतात आणि घरातील कामेही करत आहेत. त्यांना हे जॅकेट उतरविण्याची संधी केवळ पूर्ण अधिवेशनादरम्यान मिळते.
प्रत्यक्षात हे राजकीय नेते या जॅकेट्सच्या मदतीने गरोदरपणाला समजून घेत आहेत. या प्रयोगाची कल्पना ताकाको सुझुकी नावाच्या महिला राजकारण्याची आहे. या प्रयोगाच्या आधारे पुरुष राजकीय नेत्यांना गरोदरपणातील त्रास आणि आव्हाने समजविण्यास मदत करण्याचा त्यांचा विचार आहे.
जगातील अन्य भागांप्रमाणेच जपानमध्येही गरोदर महिलांची कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात नाही. गरोदरपणाच्या प्रारंभीच्या टप्प्यात अनेक समस्या यायच्या, पण तरीही बॉसकडून सुटी मागण्याची हिंमत होत नव्हती असे ओसाकामध्ये राहणाऱया एका महिलेने म्हटले आहे.
या प्रयोगाच्या आधारे गरोदर महिलांच्या काही समस्या मी जाणून घेऊ शकला आहे आणि आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्यास मदत करू असे उद्गार जपानमधील राजकीय नेते मसनओबू ओगुरा यांनी काढले आहेत. जपानमधील राजकीय नेते या महिलांच्या पाठिंब्यासाठी नवे धोरण तयार करत नसल्यास हा प्रयोग केवळ एक कृत्यासमान ठरणार आहे, यामुळे महिलांच्या स्थितीत फारसा फरक पडणार नसल्याचे करियर कंसल्टेंट असाको निहारा यांचे म्हणणे आहे.
जपानमधील अनेक गरोदर महिला योग्यप्रकारे जेवण करू शकत नाहीत, त्यांना उत्तम सहाय्याची गरज असते. या शासकीय अधिकाऱयांनी केवळ गरोदरपणाच्या प्रयोगात भाग घेऊ नये तर अशा महिलांना शक्य ती सर्व मदत करावी असे निहारा यांनी म्हटले आहे.
या जॅकेट्सची तुलना कुठल्याच अर्थाने गरोदरपणाशी केली जाऊ शकत नाही. या प्रयोगानंतर राजकयी नेते चाइल्डकेयर, वुमेन करियरसंबंधी काही धोरणे आणतील अशी अपेक्षा असल्याचे काही महिलांचे सांगणे आहे.









