टोकीयो
कोरोनाचे थैमान सध्या भारतात थांबताना दिसत असले तरी जपानमध्ये कोरोनाची लाट पुन्हा येणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले असून सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचे भय अद्यापी संपलेले नाही, हे आता जगभरातील देशांना उमजून चुकलेले आहे. जपानमध्येही सध्या या कोरोनाच्या पुन्हा येणाऱया लाटेची चिंता व्यक्त होत आहे. देशात पुन्हा चौथ्यांदा कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. जुलैच्या अखेरपर्यंत देशातील ज्येष्ठ व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण होईसतोवर ही परिस्थिती राहणार आहे. देशातील ओसाका प्रांतात कोरोनाचा फैलाव पुन्हा झाला आहे. या भागात कोरोनाची ही चौथी लाट असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी आवश्यक त्या आरोग्य व्यवस्थेची पुरेशी सोय नसल्याचे सांगितले जात आहे. देशातील इतर प्रांतातही अशीच कोरोना लाट पसरत असल्याचे दिसून आले आहे.









