ओसाका
जपानमधील ओसाका शहरातील एका इमारतीला शुक्रवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 10 महिलांचा समावेश आहे. बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओसाकाच्या मध्यवर्ती भागात एका बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मनोरुग्णालय आहे. या रुग्णालयातच आगीची घटना घडली. आपत्कालीन सेवेच्या अलर्टनंतर अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाडय़ा येथे पोहोचल्या होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्मयात आणण्यात आली, मात्र 27 जणांना प्राण गमवावे लागले.









