वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनच्या कालावधीत विविध ठिकाणी सरकारने प्रतिबंध लागू केले आहेत. तसेच काही ठिकाणी तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकारने सातत्याने चालवला आहे. यामध्ये आता जन औषध केंदांवरुन रुग्णांना औषधांची मागणी व्हॉट्अप आणि ईमेलच्या माध्यमातून करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठीची योजना आखण्यात आलीय.
सध्याच्या कालावधीत देशात 726 जिल्हय़ात 6,300 पेक्षा अधिक पंतप्रधान भारतीय जनऔषध केंद्रे कार्यरत असल्याचे सांगत रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी जनऔषध केंद्रांच्या माध्यमातून गरजूंना आवश्यक ती औषधे, सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सध्याच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध आजारी व्यक्तिंना त्य़ांची आवश्यक औषधे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन लॉकडाऊनच्या कालावधीतही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी केंदे तत्पर असतील. एप्रिल 2020 मध्ये देशात जवळपास 52 कोटी रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला आहे. यासाठी इंडिया पोस्टसोबत करार करण्यात आला असल्याचेही यांनी यावेळी सांगितले.









