नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला पॅरोल मिळाली आहे. आजारी आईची भेट घेण्यासाठी त्याला पॅरोल मिळाली आहे. राम रहीमने १ मे रोजी आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी ‘आपत्कालीन पॅरोल’ मागितली होता. आईच्या आजाराबद्दलची काही कागदपत्र त्याने तुरूंगातील अधिकाऱ्यांना दिले होते.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला राम रहिम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून रोहतकमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यापूर्वीही राम रहीम याला एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. २४ ऑक्टोबर २०२० रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होता. त्यावेळी देखील राम रहीमला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









