बेंगळूर : जनावरांच्या उपचारासाठी राज्यातील 15 जिल्हय़ांत रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात आली आहे. लवकरच उर्वरित जिल्हय़ांनाही रुग्णवाहिका देण्यात येणार आहे, असे पशुसंगोपन मंत्री प्रभु चव्हाण यांनी सांगितले. शंकर गुरुजी यांच्या आश्रमाला भेट देऊन तेथील गो-शाळेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
पशुपालकांनी 1962 या क्रमांकावर संपर्क साधल्यास शस्त्रक्रियेच्या साहित्यांसह घटनास्थळी दाखल होऊन जनावरांवर उपचार केले जाणार आहेत. गोमातेच्या संरक्षणासाठी राज्यात गोहत्या कायदा जारी केला आहे. गोमातेचे रक्षण करण्याचे आमचे कर्तव्य आहे, असेही चव्हाण म्हणाले.









