ओटवणे / प्रतिनिधी:
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या पुढाकारातून मळगाव हायस्कूलमधील १० मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून या सायकलींचे वितरण करण्यात आले. मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून जिल्ह्यात सायकल वितरण करण्यात येत आहे. याच योजनेतून मळगावातील मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात एक हजार सायकलचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी मळगांव सरपंच सौ.स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र परब, संस्थेचे संचालक रामचंद्र केळुसकर, स्थानिक कमिटी सदस्य मनोहर राऊळ, पत्रकार सचिन रेडकर, ग्रामपंचायात सदस्या निकिता बुगडे, सुभद्रा राणे, दीपक जोशी, अर्जून राऊळ, मुख्याध्यापक वैजनाथ देवण, शिक्षिका आनंदी मोर्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप कारीवडेकर यांनी तर आभार पर्यवेक्षिका श्रद्धा सावंत यांनी मानले.
Previous Articleतांबुळी मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई
Next Article पुरामध्ये नुकसान झालेल्या शाळा पुन्हा उभारणार









