प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावर मुंबई-मडगाव जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस 2 मार्चपासून नियमितपणे धावत आहे. मात्र, दर शुक्रवारी जनशताब्दी एक्सप्रेसला विस्टा डोम कोच (ग्लास टॉप) उपलब्ध होणार नाही. यामुळे 12 मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेसला फक्त दर शुक्रवारी विस्टा डोम कोच जोडला जाणार नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शुक्रवार वगळता इतर दिवशी मात्र, एक्सप्रेसला डोम कोच जोडला जाणार आहे. ही एक्सप्रेस नियमितपणे धावत असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.









