प्रतिनिधी / जत
जतचे नूतन पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी कार्यभार हाती घेताच अवैद्य धंद्यावर कारवाई करत पहिला दणका दिला आहे.या कारवाईमुळे अवैध धंद्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जतमध्ये २१ लाखांचा गुटखा गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो असा सुमारे २० लाख ८५ हजार ५८० रुपयेचा मुद्देमाल जत पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त केला आहे. याबाबत शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी (दि.१८ मार्च) रात्री बिळूर कडून जत मार्गे एका अशोक लेलॅन्ड टेम्पो मधून बेकायदेशीर गुटख्याची वाहतुक होणार असल्याची खात्रीशीर माहीती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना गोपनीय बातमी दारामार्फत मिळाली असता उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उप-निरीक्षक लक्ष्मण खरात, पोलिस नाईक सचिन हाक्के, विशाल बिले व श्री.पाटोळे या पथकाने जतमधील यलम्मादेवी गेट समोर सापळा रचून बिळूर कडुन एक अशोक लेलॅन्ड टेम्पो भरधाव वेगाने संशयीत रित्या जाताना दिसला तेव्हा त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास गणपती मंदिरा समोर पकडून टेम्पोची झाडाझडती घेतली असता टेम्पोत पाठीमागे उग्र वासाची तंबाखु व गुटख्याने भरलेली पोती व बॉक्स असल्याचे दिसुन आले.
एकूण १५ लाख ८५ हजार ५२० रुपयेचा गुटखा व ५ लाख रुपयांची अशोक लेलॅन्ड टेम्पो असा एकूण २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचालक तुषार सदाशिव देठे (वय २८ रा.हनुमान नगर अकलूज ता.माळशिरस) यास अटक केली आहे. गुन्हयांचा पुढील तपास पोलिस उप-निरीक्षक लक्ष्मण खरात हे करीत आहेत.