प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा समाजाच्या जत्तीमठ देवस्थानात वाळूपासून बनविलेल्या श्री यल्लम्मा रेणुका देवीची स्थापना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मराठा समाज जत्तीमठ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावषी वाळूपासून बनविलेली रेणुकादेवी हे यावर्षाचे खास आकर्षण असणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शहापूर येथील बालाजी देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम सारडा आणि नंदिनी दुधाचे वितरक संजय पाटील यांच्या हस्ते आरती करून पूजा करण्यात आली. सामूहिक आरतीला सरपंच दत्ता जाधव, मदन बामणे, किशोर नारळीकर, मोतेश बारदेशकर व इतर भक्त उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी येत असताना मास्क वापरणे बंधनकारक असणार असून सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. ही मूर्ती मूर्तिकार वसंत पाटील (तानाजी गल्ली) यांनी साकारली आहे.









