प्रतिनिधी / जत
नवाळवाडी येथील घटना जत तालुक्यातील नवाळवाडी येथे मातेने आपल्या दोन चिमुरडीयांसह विहीरीत उडी घेऊनआत्महत्या केली, नवाळवाडी येथील नदाफ वस्तीवर हा प्रकार घडला आहे. आई बीबीजान नदाफ, वय 27, मुले जोया नदाफ वय 5,सलमान नदाफ वय 3 ,असे मृतांची नावे आहेत. माहेरी जाण्याच्या कारणावरून या विवाहित महिलेने आपल्या पोटच्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.









