प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील कोसारी येथील ग्रामसेवक संजय भाते यांना सोमवारी एक हजार रुपयाची लाच घेताना सांगलीच्या लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. नरेगा योजनेतील गाय गोठ्याच्या प्रकरणात त्यांनी दोन हजाराची लाच मागितली होती, यातील एक हजार रुपये स्विकारताना त्यांना जत शहरातील मोरे कॉलनी येथे पकडण्यात आले.
या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई राजेश बनसोडे, सूरज गुरव, सुहास नाडगौडा, सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे जत तालुक्यातील ग्रामसेवक व पंचायत समिती त खळबळ उडाली आहे.
Previous Articleअब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी `व्हाईट मनी’ लागतो
Next Article नांदणी नाका येथील डंपर चोरणाऱ्यास केली अटक








