जत/प्रतिनिधी
जत तालुक्याचे माजी आमदार मधुकर शंकर कांबळे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 58 वर्षाचे होते , 1995 साली ते जत मतदारसंघातुन अपक्ष निवडून आले होते, त्यावेळी त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता. याकाळात जत तालुक्यातील रस्ते, ग्रामीण पाणी योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना या कामाना गती दिली होती. पुढे बरीच वर्षे त्यांनी भारतीय जनता पार्टीत काम केले. पण अलीकडच्या काही वर्षांत सक्रिय राजकारणा पासून ते बाजुला होते.