प्रतिनिधी / बेंगळूर
मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते, खासदार आणि आमदार असलेला भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय प्रधान सचिव सी. टी. रवी यांनी केले. बेंगळुर येथील मल्लेश्वरममधील भाजप कार्यालयात भाजपच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सी. टी. रवी पुढे म्हणाले, केंद्रात सलग दुसऱयांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वतःच्या बळावर भाजप पक्ष सत्तेवर आला आहे. तसेच तिसऱया वेळेसही भाजपच सत्तेवर येणार असल्याचे निश्चित आहे. देशातील गरीब सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी किसान सन्मान, जनधन, उज्ज्वला आणि आयुष्मानसह विविध योजना केंद्र सरकार राबवित आहे. 370 कमल रद्द करून भाजपने काश्मिरला न्याय मिळवून दिला आहे. अयोध्येत राममंदिर निर्माण करण्याद्वारे देशाच्या सांस्कृतिक अस्मितेला गौरव मिळवून देण्याचे कार्य भाजपने केले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रधान सचिव सिद्दराजू, राज्य सचिव जगदीश हिरेमनी, के. एस. नवीन, छलवादी नारायण स्वामी, लोकेश अंबेकल्लू, करुणाकर कासले, बी. नारायण यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.









