ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कारण आता कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखाच्या वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे एक लाख 8 हजार नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे 4 लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत. अजून बारा लाख 68 हजार कोरोनाबाधित असून त्यातील चार टक्के म्हणजेच 50 हजार 590 गंभीर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात 1830 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत एकूण बळींची संख्या वीस हजाराच्या वर पोहचली आहे. तर रुग्णांची संख्या पाच लाखांच्या वर पोहोचली आहे.
स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 525 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामूळे एकूण मृतांचा आकडा 16,606 वर पोहचला आहे. जर्मनीमध्ये काल 135 बळी गेले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या 2 हजार 871 झाली आहे.
तर भारत देशात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 356 वर पोहचली असून 273 जणांनी आपला जीव गमावला आहे. 717 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
हॉलंड मध्ये 2, 643 , टर्की मध्ये 1101, स्वीडन मध्ये 888, स्विझरलँड मध्ये 1036, दक्षिण कोरियात 211, पाकिस्तान मध्ये 86 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 80 हजार 218, तर बळींची आकड्यात 6 हजार 83 रुग्णची भर पडली आहे.









