ऑनलाईन टीम / मेलबर्न :
जगातील 7.70 लाख लोकांनी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ‘पेंग्विन परेड’ ऑनलाईनच्या माध्यमातून पाहिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्टोरियातील फिलिप द्वीप समूहातील नेचर पार्कमधून सध्या पेंग्विन समुद्रात परतत आहेत. दरवर्षी हे दृश्य बघण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. मात्र, कोरोना संकटामुळे यंदा या घटनेचे प्रसारण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
जवळपास 3500 पेंग्विन मंगळवारी समुद्रात परतले. अमेरिका जपान चीन आणि जर्मनी यासह 30 पेक्षा अधिक देशांमध्ये ही घटना पाहिली गेली. या ‘पेंग्विन परेड’ चे टिव्ही वर देखील ऑनलाईन प्रसारण करण्यात आले होते.









