ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. मस्क यांची संपत्ती 127.9 अब्ज डॉलर आहे.
ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार, मस्क हे जानेवारीमध्ये श्रीमंतांच्या यादीत 35 व्या स्थानावर होते. टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांची एकूण संपत्ती 7.2 अब्ज डॉलर वाढून 127.9 अब्ज डॉलर झाली आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत जवळपास 110.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे.
यापूर्वी बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते. तेव्हा त्यांची संपत्ती 128 अब्ज डॉलर होती. मागील वर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणात दान केल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावरून खाली आले. बिल गेट्स काही काळ श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावरही होते.









