ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 1 कोटी 10 लाख 16 हजार 327 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 61 लाख 72 हजार 791 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 2 लाख 08 हजार 864 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 5 लाख 24 हजार 748 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 43 लाख 18 हजार 788 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 57 हजार 913 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 28 लाख 37 हजार 189 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 11 लाख 91 हजार 310 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 31 हजार 485 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 15 लाख 01 हजार 353 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 9 लाख 16 हजार 147 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 61 हजार 990 जणांचा मृत्यू झाला आहे.