ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 4 कोटी 91 लाख 30 हजार 236 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 3 कोटी 50 लाख 43 हजार 166 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 6 लाख 08 हजार 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 8771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 1 कोटी 28 लाख 45 हजार 853 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 90 हजार 160 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 12 लाख 41 हजार 217 जणांचा बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 99 लाख 26 हजार 637 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 63 लाख 41 हजार 604 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 41 हजार 026 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 84 लाख 11 हजार 724 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 77 लाख 65 हजार 966 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 25 हजार 029 जणांचा मृत्यू झाला आहे.









