ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात मागील 24 तासात 1 लाख 24 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3415 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगभरात आतापर्यंत 81 लाख 28 हजार 488 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 39 हजार 421 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 42 लाख 42 हजार 134 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 34 लाख 46 हजार 933 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 54 हजार 571 केसेस गंभीर आहेत.
सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 21 लाख 82 हजार 950 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 18 हजार 283 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 8 लाख 91 हजार 556 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 44 हजार 118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. रशियात 5 लाख 45 हजार 458 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7 हजार 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









